सीना - माढा उपसा सिंचन योजना बंद न करण्याबाबतचे दिले पत्र
सोलापूर, 26 मार्च (हिं.स.)। राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानभवनात भेट घेऊन सीना - माढा उपसा सिंचन योजना बंद न करण्याबाबतचे पत्र दिले असता ; ही योजना परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी फोनवरून संबंधित
सीना - माढा उपसा सिंचन योजना बंद न करण्याबाबतचे दिले पत्र


सोलापूर, 26 मार्च (हिं.स.)। राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानभवनात भेट घेऊन सीना - माढा उपसा सिंचन योजना बंद न करण्याबाबतचे पत्र दिले असता ; ही योजना परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.याबाबत आमदार पाटील यांनी दिलेली माहिती अशी की सध्या या योजनेची पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे ही योजनेतून सोडले जाणारे बंद करणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांची भेट घेऊन सदर योजनेतून पाणी बंद झाल्यास अनेक शेतकऱ्यांची पिके जळून जातील.शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता ही योजना चालू ठेवण्याबाबत निवेदन दिले. त्यावर जलसंपदा मंत्र्यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सदर योजना सुरू ठेवण्याबाबत आदेश दिले. यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे. या योजनेतून टेल टू हेड शेतकऱ्यांना पाणी मिळेपर्यंत सुरळीत चालणार असल्याची नोंद सर्व शेतकरी बांधवांनी घेण्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande