येलदरीत ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने येलदरी नगरी दुमदुमली
परभणी, 26 मार्च (हिं.स.)। येलदरी येथील मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे संपूर्ण येलदरी नगरी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेल
येलदरीत ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने येलदरी नगरी दुमदुमली


परभणी, 26 मार्च (हिं.स.)।

येलदरी येथील मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे संपूर्ण येलदरी नगरी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेली. जन्मोत्सवानिमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक विधींना प्रारंभ झाला होता. दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत परिसर भक्तिमय करून टाकला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्थानिक भजनी मंडळाचा कार्यक्रम होय. भजनी मंडळाने सादर केलेल्या सुरेल आणि भावस्पर्शी भजनांमुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. या सोहळ्यासाठी येलदरी व परिसरातील नागरिकांसह महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या भाविकांमुळे उत्सवाला अधिकच रंगत आली होती. मंदिर समितीच्या वतीने दर्शन व कार्यक्रमासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. जन्मोत्सव सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ येलदरीसह पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी घेतला. गावातील तरुण व स्वयंसेवकांनी महाप्रसाद वाटपासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. एकूणच भक्ती, शक्ती आणि उत्सव यांचा सुंदर संगम या सोहळ्याच्या निमित्ताने येलदरी येथे अनुभवायला मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande