साेलापूरातील गणवेश निर्मितीच्या कामाला हिरवा कंदील
सोलापूर, 26 मार्च (हिं.स.) युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्यात बंद होणे, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे कापड उद्योगावरील संकट गंभीर झाले होते. अडचणीत आलेल्या सोलापूरच्या या उद्योगाला राज्य शासनाने मोठा दिलासा देत, गणवेश निर्मितीच्या कामाला
साेलापूरातील गणवेश निर्मितीच्या कामाला हिरवा कंदील


सोलापूर, 26 मार्च (हिं.स.)

युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्यात बंद होणे, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे कापड उद्योगावरील संकट गंभीर झाले होते. अडचणीत आलेल्या सोलापूरच्या या उद्योगाला राज्य शासनाने मोठा दिलासा देत, गणवेश निर्मितीच्या कामाला हिरवा कंदील मिळाल्याने सुमारे ३५ हजार शिलाई कामगारांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गणवेश निर्मिती विस्कळीत झाली होती. राज्य शासनाने स्थानिक उद्योगांना काम न देता केंद्रीय पद्धतीने कापड खरेदी करून सोलापूरच्या कापड उद्योगाला अडचणीत आणले होते. त्याचा जबरदस्त फटका हजारो कामगारांना बसला होता.त्यानंतर या वर्षी नेमके काय होणार, असा प्रश्न समोर होता. त्यातच जागतिक युद्धाला तोंड फुटले आहे. या युद्धामुळे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला आहे. निर्यातीसाठी तयार असलेला माल शिपमेंट नसल्याने पडून आहे. तसेच नव्या ऑर्डरही मिळेनाशा झाल्या आहेत. त्यातच पेट्रोलियम पदार्थांशी संबंधित कच्च्या मालाचे दर अडीच ते तीनपट वाढले आहेत. त्यामुळे हे संकट दुहेरी झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande