सोलापूर महापालिकेत चार वर्षांनंतर स्थापन होणार नामविधान समिती
सोलापूर, 26 मार्च (हिं.स.)महानगरपालिकेच्या झालेल्या पहिल्याच महासभेत पटलावरील एकूण विषयांपैकी ४० टक्के प्रस्ताव चौक आणि रस्त्यांच्या नामकरणासंदर्भातील होते. सभेत १२ प्रस्ताव यासंदर्भात मांडण्यात आले. विकासापेक्षा नगरसेवकांनी समाज व व्यक्तिकेंद्री व
smc


सोलापूर, 26 मार्च (हिं.स.)महानगरपालिकेच्या झालेल्या पहिल्याच महासभेत पटलावरील एकूण विषयांपैकी ४० टक्के प्रस्ताव चौक आणि रस्त्यांच्या नामकरणासंदर्भातील होते. सभेत १२ प्रस्ताव यासंदर्भात मांडण्यात आले. विकासापेक्षा नगरसेवकांनी समाज व व्यक्तिकेंद्री विषयच मांडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हे प्रस्ताव सभागृहात एकमताने मंजूरही करण्यात आले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका सदस्यांकडून ठोस निर्णय आणि कृती आराखड्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात मात्र विकासकामांपेक्षा धर्म, जात आणि व्यक्तिकेंद्री विषयांवरच अधिक भर दिला जात असल्याची टीकाही होत आहे. सभेच्या पटलावर असलेल्या ५७ विषयांपैकी ३२ हे सभासदांचे प्रस्ताव असून, त्यांपैकी सुमारे ५० टक्के प्रस्ताव चौक व रस्त्यांना नावे देणे तसेच ठराविक नेत्यांचे पुतळे उभारण्यासंदर्भातील होते. नव्याने आलेल्या नगरसेवकांकडून रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे या महासभेतील प्रस्तावांवरून दिसून येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande