
नाशिक, 26 मार्च (हिं.स.)।
-जागतिक दर्जाच्या शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी संदीप फाऊंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला असून संदीप फाउंडेशन अंतर्गत असलेली विविध महाविद्यालये तसेच संदीप विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट देण्यात यश आले आहे. याच्यापुढे जाऊन महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी यासाठी संदीप फाऊंडेशन तर्फे 27 मार्च शुक्रवार रोजी संदीप मेगा जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी दिली.
यावर्षी मेगा जॉब फेअरमध्ये सॉफ्टवेअर, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कन्सल्टिंग, सर्व्हिस ,कन्स्ट्रक्शन अशा उद्योगात काम करणाऱ्या सुमारे 250 हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. यासोबतच या जॉब फेअरमध्ये राज्यातील सुमारे 6500 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी कमीत कमी 2500 विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल असा विश्वास आहे. यावर्षी जॉब फेअर मध्ये नाशिक, पुणे, मुंबई नागपूर ,नोएडा ,बंगलुरु तसेच गुजरात येथील कंपन्यांनी सहभाग घेतला असून निमा व आयमा या संस्थांचे देखील सहकार्य लाभले आहे. अशा प्रकारच्या जॉब फेअर चे आयोजन नाशिक व सिजौल, बिहार येथील संदीपच्या कॅम्पस मध्ये दरवर्षी करण्यात येते.
संदीपमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध Value Added Programs (VAP) सुद्धा मोफत दिले जातात. या अंतर्गत उद्योगांच्या गरजांप्रमाणे स्किल बेस्ड शिक्षण तसेच एम्प्लॉयमेंट एन्हान्समेंट सर्टिफिकेट दिले जाते. या सोबतच विद्यार्थ्यांना विविध उद्योगात प्राधान्य मिळावे यासाठी इंडस्ट्री -इन्स्टिट्यूट समन्वय साधला जातो. याशिवाय सध्या काम करत असणाऱ्या मनुष्यबळासाठी विविध पार्ट टाइम कोर्सेस पण संदीपमध्ये उपलब्ध आहेत.
शिक्षण क्षेत्राचे नाशिकच्या विकासासाठी योगदान
आजमीतिला संदीपच्या परिसरात जवळपास 18000 हून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहेत. यामध्ये विदेशातील विद्यार्थ्यांचा पण समावेश आहे. यासोबतच 100हून अधिक विदेशी विद्यापीठांसोबत संदीपने शैक्षणिक आदान प्रदानाचे करार केले असून त्यामुळे जागतिक शिक्षणाची कवाडे उघडली आहेत.
नॉलेज व टेक्नॉलॉजी वर आधारित अर्थकारण हे शहराच्या समग्र विकासासाठी पूरक असून महाराष्ट्रातील एज्युकेशन हब म्हणून नाशिक नावारूपाला येत आहे असेही डॉ. संदीप झा म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV