नंदुरबार : ‘टीबी मुक्त भारत'साठी १०० दिवसांच्या विशेष मोहिमेचा प्रारंभ
नंदुरबार:, 26 मार्च (हिं.स.) जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार जेथे विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून ''प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान २.०
टीबी मुक्त भारत


नंदुरबार:, 26 मार्च (हिं.स.) जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार जेथे विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 'प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान २.०' अंतर्गत जिल्ह्यात १०० दिवसांच्या विशेष टीबी मुक्त अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी - डॉ. महेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार येथील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य परिचारिका, नर्सिंग कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी क्षयरोगाचे जीवाणू शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी 'टीबी मुक्त भारत' अभियानाची शपथ घेतली. जिल्ह्यातील नागरिकांनी 'निक्षय मित्र' बनून क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन मदत करावी, असे आवाहन यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. महेंद्र चव्हाण यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले तसेच शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष दीपक पाटील यांनी निक्षयमित्र बनून 40 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण केले. तर छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे NTVS नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी क्षयरोग विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली. तालुकास्तरावर जनजागृती रॅली, आशा सभा, माहिती पुस्तिकांचे वाटप तसेच कम्युनिटी मिटिंग्स आयोजित करण्यात आल्या.

'टीबी मुक्त भारत' १०० दिवसीय मोहिमेचा उद्देश

जिल्ह्यात टीबी निर्मूलनासाठी पुढील १०० दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये संशयित रुग्णांचा शोध, त्वरित तपासणी, नियमित उपचार आणि पोषण सहाय्य यावर विशेष भर दिला जाणार आहे. उच्च जोखमीच्या भागांमध्ये विशेष तपासणी शिबिरे, घरभेटी आणि संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande