

डोंबिवली, 26 मार्च, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व श्रीराम नवमी उत्सव समिती डोंबिवली पश्चिम माध्यमातून पश्चिमकडील घन:श्याम गुप्ते रोडवरील बाळकृष्ण अपार्टमेंटसमोरील भव्य मंडपात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. रामनवमीला सकाळी श्री राम जन्माचे कीर्तन कीर्तनकार महेश शुक्ला यांनी केले. कीर्तन झाल्यावर रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
महिलांनी यावेळी पाळणा म्हटला. श्रीराम दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गेली बावीस वर्षे श्री रामनवमी उत्सव साजरा केला जातो. भाविकांना सुंठवडा, पेढा प्रसाद आणि थंडगार पन्हे देण्यात आले. सदर श्रीराम नवमी उत्सव यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पद्माकर कुलकर्णी , भाजपा मंडल अध्यक्ष प्रिया जोशी, विनोद छत्रपती म्हात्रे, विनायक करंदीकर, संतोष विठ्ठल, संदीप गव्हाणे, सुनील सामंत, रेखा असवदेकर, शुभांगी दिवटे, कृष्णा परुळेकर, रमा म्हात्रे, विशाल पारखे, साधना गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी व नगरसेवक नगरसेविका व श्री राम भक्तांनी दर्शन घेतले.
तसेच पूर्वेकडील रामनगर विभागात असलेल्या पोलीस ठाण्यात, आफळे राम मंदिरात, चिपळूणकर क्रॉस रोडवरील मंदिरात, बाजीप्रभू चौकातील राम मंदिरात श्रीराम नवमीचा उत्सव साजर झाला. श्री हरी स्वामी समर्थ सेवा मंडळ संचालित गोविंदानंद श्रीराम मंदिरात, पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून सुंठवडा प्रसाद दिला. राम जन्मला ग सखे राम जन्मला हे भजन म्हटले. दिवसभर श्री रामाचा पाळणा दर्शनासाठी ठेवला होता. श्री गणेश मंदिर संस्थान येथे सकाळी महापूजा होऊन रामजन्म कीर्तन आणि राम नाम जप समाप्ती झाली. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये राम नामाचे महत्व सांगणारी भजने सुरु होती. राम नाम गाण्यामुळे ठिकठिकाणी वातावरण भक्तिमय होते.
तसेच श्री साईश भक्त मंडळ, डोंबिवली पूर्व तर्फे श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. तर श्री रामनवमी निमित्त डोंबिवली पूर्वेकडील आयोध्यानगरी येथील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव करून आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील, समाजसेवक सुजित नलावडे, विकी हिंगे, संजय राणे आदींसह अनेक भक्तगण उपस्थित होते. भक्तगणांनी मंदिरात श्री रामाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi