अबू धाबीमध्ये क्षेपणास्त्राचा मलबा पडल्याने दोघांचा मृत्यू
अबू धाबी, 26 मार्च (हिं.स.)। संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे एक क्षेपणास्त्र हवेतच रोखण्यात आल्यानंतर त्याचे अवशेष स्वेहान रोडवर पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी तीन जण जखमी झाले असून अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. यापूर्वी इर
अबू धाबीमध्ये क्षेपणास्त्राचा मलबा पडल्याने दोन जणांचा मृत्यू


अबू धाबी, 26 मार्च (हिं.स.)। संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे एक क्षेपणास्त्र हवेतच रोखण्यात आल्यानंतर त्याचे अवशेष स्वेहान रोडवर पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी तीन जण जखमी झाले असून अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे.

यापूर्वी इराणने कुवैतवर हल्ला केला होता. कुवैत लष्कराच्या जनरल स्टाफ मुख्यालयाने गुरुवारी सकाळी निवेदन जारी करून याची माहिती दिली. लष्कराच्या निवेदनानुसार, या हल्ल्यात क्षेपणास्त्रांसह ड्रोनचाही वापर करण्यात आला होता.

नागरिकांना अधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेल्या सर्व सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, सौदी अरेबियालाही रात्रीभर इराणकडून अनेक हल्ल्यांचा सामना करावा लागल्याची माहिती देण्यात आली. देशावर रात्रीच्या काळात इराणकडून आठ मानवरहित हवाई वाहनांचे हल्ले करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande