केज तालुक्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा; चार गावांसाठी बोअर अधिग्रहणाचा प्रस्ताव
बीड, 26 मार्च (हिं.स.)। उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच जिल्ह्यातील केज तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील साबला, आनंदवाडी, कोठी, बेलगाव आणि केळगाव या गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे स्रोत निकामी झाल्याने ग्रामस्थांना पा
केज तालुक्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा; चार गावांसाठी बोअर अधिग्रहणाचा प्रस्ताव


बीड, 26 मार्च (हिं.स.)।

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच जिल्ह्यातील केज तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील साबला, आनंदवाडी, कोठी, बेलगाव आणि केळगाव या गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे स्रोत निकामी झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी पंचायत समितीच्या टंचाई विभागाकडे बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केले आहेत. जमिनीतील पाणी पातळी वेगाने खालावल्याने रब्बी आणि ऊस पिकांच्या सिंचनावरही मोठा परिणाम झाला आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी नागरिकांना आता प्लास्टिक ड्रम आणि मातीच्या माठ खरेदीला प्राधान्य द्यावे लागत आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर तहसीलदार या प्रस्तावांना अंतिम मंजुरी देणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande