'ॲनिमल' नाटकाच्या प्रयोगादरम्यान सिद्धार्थ जाधव झाला भावूक
मुंबई, 26 मार्च, (हिं.स.)। ''ॲनिमल'' नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधव भावूक झाला. त्याच्या टीममधील एक सदस्य आणि त्याच्या चाहत्याने थेट हातावरच सिद्धार्थ जाधवच्या चेहऱ्याचा टॅटू काढून त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं. ‘ॲनिमल’ हे ना
'ॲनिमल' नाटकाच्या प्रयोगादरम्यान सिद्धार्थ जाधव झाला भावूक


मुंबई, 26 मार्च, (हिं.स.)। 'ॲनिमल' नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधव भावूक झाला. त्याच्या टीममधील एक सदस्य आणि त्याच्या चाहत्याने थेट हातावरच सिद्धार्थ जाधवच्या चेहऱ्याचा टॅटू काढून त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं.

‘ॲनिमल’ हे नाटक महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित असून सिद्धार्थ जाधव या प्रयोगात दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे ते या नाटकाचे निर्मातेही आहेत. आई-वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या ‘ताराराम’ या निर्मिती संस्थेची ही पहिली निर्मिती असून, या नाटकातून त्या संस्थेचा रंगभूमीवरील प्रवास सुरू होत आहे.

नाटकाची कथा दत्तू या तरुणाभोवती फिरते. छोट्या गावातून मुंबईत आलेला हा तरुण अभिनेता होण्याचं स्वप्न पाहतो. मात्र शहरातील स्पर्धा, अस्थिरता, नात्यांमधील अंतर आणि मानसिक ताण यांच्या घुसमटीत त्याचा प्रवास अधिक गुंतागुंतीचा होत जातो. एका व्यक्तीच्या मनात चालणारी ही झुंज रंगमंचावर एकपात्री शैलीत साकारली जाणार आहे.

सिद्धार्थ म्हणतो, “हे नाटक मला कलाकार म्हणून नव्याने तपासतं. प्रत्येक प्रयोगासोबत हा प्रवास अधिक खोल होत जातो. सलग वेगवेगळ्या रंगमंचांवर प्रेक्षकांसमोर उभं राहणं म्हणजे प्रत्येक वेळी नवा अनुभव जगण्यासारखं आहे.”

स्वतः महेश मांजरेकर यांनी या नाटकाला संगीत दिले असून, एकपात्री मांडणी आणि सिद्धार्थ जाधव यांचे रंगमंचावरील पुनरागमन यामुळे ‘ॲनिमल’च्या या प्रयोगमालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande