धुळे - इंधनाची साठेबाजी, काळाबाजार करणा-यांना प्रशासनाचा सक्त इशारा
धुळे, 26 मार्च, (हिं.स.) सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, इंधनाचा तुटवडा भासण्याची भीती दाखवून काही घटकांकडून इंधनाची साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्
धुळे - इंधनाची साठेबाजी, काळाबाजार करणा-यांना प्रशासनाचा सक्त इशारा


धुळे, 26 मार्च, (हिं.स.) सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, इंधनाचा तुटवडा भासण्याची भीती दाखवून काही घटकांकडून इंधनाची साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, धुळे जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा व साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून जिल्हा प्रशासन इंधन पुरवठ्यावर सतत लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊ नये. तसेच गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी व अनावश्यक साठवणूक करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इंधनाचा अनधिकृत साठा करणे किंवा चढ्या दराने विक्री करणे हा जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५. नुसार गंभीर गुन्हा असून अशा प्रकारच्या कोणात्याही हालचालींवर पुरवठा विभागाची करडी नजर असणार आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही परिस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅन,ड्रम किंवा इतर अप्रामाणित कंटेनरमध्ये इंधनाची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे इंधन साठवणे हे सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन असून ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे नागरीकांनी आफवांवर विश्वास ठेवू नये, गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी व अनावश्यक साठवणूक करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande