जळगाव - १५ लाखांचा साडेसात क्विंटल डिंक जप्त; चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव, 27 मार्च, (हिं.स.) पाल वन विभागाने अवैध डिंक संकलन आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १५ लाखांचा साडेसात क्विंटल डिंक जप्त केला आहे. या कारवाईत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.

पाल वनक्षेत्रातील गारबर्डी परिमडळातील कक्ष क्र. ३२ मध्ये अवैधरित्या डिंक संकलन आणि वाहतूक करताना गणदास गबू डुडवे (वय ३८), अमित सुजाण मोरे (२१), सावन रणजित मोरे (क्य २४, सर्व रा. मेंढागड, खरगोन), हेमराज होरपाल चव्हाण (२२ रा. मांडवखेडा, खरगोण) हे मिळून आले. त्यांच्याकडून ११० किलो धावडा डिंक जप्त करण्यात आला.पुढील चौकशीत पाल येथील व्यापाऱ्यांच्या अवैध गोडाऊनमध्ये धाडी टाकून धावडा, सलाई, कड प्रजातीचा एकूण ७,५०० किलो अंदाजित रक्कम १५ लाख रुपये किमतीचा डिंक जप्त करण्यात आला.

या कारवाईत दोन वाहन जप्त करण्यात आली. सहायक वन संरक्षक सत्यजित निकत यांच्या मार्गदर्शनात आरएफओ शीतल नगराळे यांच्या पथकाने कारवाई केली. वनपाल संभाजी सूर्यवंशी, मोहसीन तडवी, रणधीर काटे, संजय बारेला, जगदीश बारेला आदींचा समावेश होता. पोनि डॉ. विशाल जयस्वालांची मदत झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

 rajesh pande