
लातूर, 27 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने लातूर शहरात पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीतील खाडगाव रोड परिसरात साई विहार ते खाजा नगर रोड दरम्यान एक पांढऱ्या रंगाची फोर्ड फियस्टा कार (क्र. MH-04-DN-8591) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करणारा आसद मोहम्मद हनिफ शेख (वय ३० वर्षे, रा. खाजा नगर, लातूर) याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये विमल पान मसाला,,V-1 तंबाखू, रजनीगंधा पान मसाला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ एकूण किंमत : ₹२,७९,१२०/- तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली फोर्ड फियस्टा कार (क्र. MH-04-DN-8591) किंमत ₹७,५०,०००/-एकूण जप्त मुद्देमाल ₹१०,२९,१२०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. (BNS) कलम १२३, २७३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर करीत आहेत.
सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis