जळगावात गुटखा तस्करीवर कारवाईत ६.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, 27 मार्च (हिं.स.)मुक्ताईनगर तालुक्यात प्रतिबंधित गुटखा साठ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अवैध गुटखा साठा आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्य
जळगावात गुटखा तस्करीवर कारवाईत ६.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त


जळगाव, 27 मार्च (हिं.स.)मुक्ताईनगर तालुक्यात प्रतिबंधित गुटखा साठ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अवैध गुटखा साठा आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुर्णाड फाटा ते सुकळी गावादरम्यान सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातून केसरयुक्त पानमसाला आणि तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुमारे २ लाख ४३ हजार रुपयांचा गुटखा, ४ लाख रुपये किमतीचे वाहन आणि मोबाईल असा एकूण ६.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसायावर पोलिसांची नजर असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande