ट्रेलरच्या धडकेत इनोव्हा कारचे नुकसान; चालक फरार, पेणमध्ये गुन्हा दाखल
रायगड, 27 मार्च (हिं.स.)। भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या ट्रेलरने इनोव्हा कारला धडक देऊन अपघात घडविल्याची घटना पेण पोलीस ठाणे हद्दीत घडली असून अपघातानंतर चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती
Innova car damaged in collision with trailer; Driver absconding, case registered in Pen


रायगड, 27 मार्च (हिं.स.)। भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या ट्रेलरने इनोव्हा कारला धडक देऊन अपघात घडविल्याची घटना पेण पोलीस ठाणे हद्दीत घडली असून अपघातानंतर चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. 26 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास मौजे गागोदे गाव हद्दीत, पेण-खोपोली मार्गावरील वरसई फाट्याजवळ घडली. तक्रारदार आपल्या कुटुंबीयांसह इनोव्हा क्रिस्टा (क्रमांक MH-06-CP-0862) या कारने मांडवा येथून पेणमार्गे उरण येथील नातेवाईकांना घेऊन कार्ले येथील एकविरा देवी यात्रेसाठी निघाले होते. दरम्यान, खोपोलीकडून येणाऱ्या ट्रेलर (क्रमांक MH-12-LT-6436) चालकाने ट्रेलरवरील गोलाकार लोखंडी सामान बॉडीच्या बाहेर आलेल्या अवस्थेत, अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवित कारच्या उजव्या बाजूस धडक दिली.

या अपघातात कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित ट्रेलर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 50/2026 नुसार मोटार वाहन अधिनियम 1988 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande