लातूरमध्ये घरफोडी प्रकरणाचा काही तासांत छडा; दोन आरोपी अटकेत
लातूर, 27 मार्च (हिं.स.) । लातूर जिल्ह्यात मालमत्ता संबंधी गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने कठोर आणि परिणामकारक कारवाई करण्यात येत आहे. घरफोडी, चोरी व दरोड्यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तपास पद्
लातूर पोलीस


लातूर, 27 मार्च (हिं.स.) । लातूर जिल्ह्यात मालमत्ता संबंधी गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने कठोर आणि परिणामकारक कारवाई करण्यात येत आहे. घरफोडी, चोरी व दरोड्यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तपास पद्धती, बातमीदार आणि तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत जलद व नियोजनबद्ध कारवाई करत घरफोडी प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे.

दिनांक 26 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वाखाली आरोपींचा शोध सुरू होता. गस्ती दरम्यान लातूर-मुरुड मुख्य मार्गावरील रामेगाव पाटी येथे मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता मोटारसायकलसह थांबलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे

अतुल चंद्रकांत आमले (वय 30, रा. मुळशी, जि. पुणे)

रामेश्वर लिंबराज उपल्ले (वय 24, रा. रायवाडी, ता. चाकूर, जि. लातूर)

अशी सांगितली.

त्यांच्या ताब्यातून सोने व चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत त्यांनी लातूर शहरातील पोतदार स्कूल परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 153/2026, कलम 303(2) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

कारवाईदरम्यान आरोपींकडून ₹39,800 किंमतीचे सोने-चांदीचे दागिने तसेच ₹1,00,000 किंमतीची मोटारसायकल (MH-24-BY-7951) असा एकूण ₹1,39,800 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.लातूर जिल्हा पोलीस दलाने दाखवलेल्या सतर्कता, जलद प्रतिसाद आणि प्रभावी तपास कौशल्यामुळे अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande