बदनामीच्या आरोपांवरून संपादकाविरुद्ध एनसीआर दाखल; कर्जत पोलिसांत नोंद
रायगड, 27 मार्च (हिं.स.)। खोटी व बदनामीकारक माहिती प्रकाशित केल्याच्या आरोपावरून कर्जत पोलीस ठाण्यात एका संपादकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित तक्रारदारास पुढील न्यायालयीन कार्यवाही करण्याचा सल्ला पोलिसांनी
NCR filed against editor on defamation charges; registered with Karjat police


रायगड, 27 मार्च (हिं.स.)। खोटी व बदनामीकारक माहिती प्रकाशित केल्याच्या आरोपावरून कर्जत पोलीस ठाण्यात एका संपादकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित तक्रारदारास पुढील न्यायालयीन कार्यवाही करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका साप्ताहिकाचे संपादक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 356(2) अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलीस नोंदीनुसार, एनसीआर क्रमांक 0293/2026 हा दिनांक 27 मार्च 2026 रोजी दुपारी 1:57 वाजता कर्जत पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, दिनांक 25 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9:45 वाजता संबंधित माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत तक्रारदार यांचे नाव चुकीच्या संदर्भात जोडण्यात आले. त्या बातमीत तक्रारदारांनी शासकीय योजना मिळवून देण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आल्याचे नमूद आहे.

तक्रारदारांनी सदर आरोप फेटाळून लावत संबंधित बातमी अप्रमाणित व तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. तसेच, कोणतीही खातरजमा न करता ती प्रकाशित केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बातमीमुळे त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक प्रतिमेला धक्का बसल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

पुढे, तक्रारदारांनी संबंधित संपादकाशी संपर्क साधून बातमी मागे घेण्याची विनंती केल्याचे सांगितले असून, ती विनंती मान्य करण्यात आली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली असून, कायद्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी तक्रारदारांना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande