सॅमसंग गॅलेक्सी बुक 6 सिरीज भारतात लाँच; अल्ट्रा, प्रो आणि स्टँडर्ड मॉडेल्स उपलब्ध
मुंबई, 28 मार्च (हिं.स.)। सॅमसंगने आपली नवी गॅलेक्सी बुक 6 सिरीज भारतात अधिकृतपणे लाँच केली असून यूकेसह इतर बाजारपेठांमध्ये लाँच झाल्यानंतर सुमारे महिन्याभरात ही सिरीज भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये गॅलेक्सी बुक 6 अल्ट्रा
Samsung Galaxy Book 6 Series Launched


मुंबई, 28 मार्च (हिं.स.)। सॅमसंगने आपली नवी गॅलेक्सी बुक 6 सिरीज भारतात अधिकृतपणे लाँच केली असून यूकेसह इतर बाजारपेठांमध्ये लाँच झाल्यानंतर सुमारे महिन्याभरात ही सिरीज भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये गॅलेक्सी बुक 6 अल्ट्रा, गॅलेक्सी बुक 6 प्रो आणि स्टँडर्ड गॅलेक्सी बुक 6 असे तीन मॉडेल्स समाविष्ट आहेत. हे लॅपटॉप्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ऑथोराइज्ड ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदीसाठी उपलब्ध असून प्रोफेशनल्स आणि स्टुडंट्स दोघांसाठीही हे आकर्षक पर्याय म्हणून समोर आले आहेत.

गॅलेक्सी बुक 6 अल्ट्रा हा या सिरीजमधील फ्लॅगशिप मॉडेल असून तो विंडोज 11 सह येतो. यात 16 इंचाचा डब्ल्यूक्यूएक्सजीए प्लस अॅमोलेड टच स्क्रीन देण्यात आला आहे, जो 1000 निट्स ब्राइटनेससह उत्तम व्हिज्युअल अनुभव देतो. यामध्ये अँटी-रिफ्लेक्टिव कोटिंग असल्यामुळे प्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसते. हा लॅपटॉप इंटेल कोर अल्ट्रा एक्स7 सिरीज 3 इवो एडिशन प्रोसेसर आणि एनव्हिडिया जिओफोर्स 5070 जीपीयूने सुसज्ज आहे. यामध्ये 32 जीबी पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1 टीबी पीसीआयई एसएसडी स्टोरेज मिळते. तसेच 1080पी फुल एचडी वेबकॅम, टून टोन प्रो बॅकलिट कीबोर्ड आणि हॅप्टिक टच ट्रॅकपॅडसारख्या प्रीमियम फीचर्सही देण्यात आले आहेत.

गॅलेक्सी बुक 6 प्रो मॉडेलमध्येही समान प्रोसेसर ऑप्शन्स आणि अॅमोलेड डिस्प्ले मिळतो, मात्र यामध्ये इंटेल आर्क इंटिग्रेटेड जीपीयू दिला आहे. या मॉडेलमध्ये 16 इंचासाठी 78 डब्ल्यूएच आणि 14 इंचासाठी 67 डब्ल्यूएच बॅटरी दिली आहे. वजनाच्या बाबतीत हे मॉडेल हलके असून 16 इंच व्हेरिएंटचे वजन 1.59 किलो आणि 14 इंच व्हेरिएंटचे वजन 1.24 किलो आहे, त्यामुळे पोर्टेबिलिटीसाठी हे अधिक सोयीचे ठरते.

स्टँडर्ड गॅलेक्सी बुक 6 मध्ये 16 इंच टच आणि नॉन-टच तसेच 14 इंच नॉन-टच असे विविध डिस्प्ले पर्याय देण्यात आले आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये डब्ल्यूयूएक्सजीए आयपीएस टचस्क्रीन असून 350 निट्स ब्राइटनेस मिळतो. यामध्ये इंटेल कोर अल्ट्रा 7 प्रोसेसर, 49 टॉप्स एनपीयू आणि इंटिग्रेटेड जीपीयू देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6ई आणि ब्लूटूथ 5.4 सपोर्ट देण्यात आला असून या लॅपटॉप्सचा फोकस स्लिम डिझाइन, चांगली बॅटरी लाईफ आणि गॅलेक्सी डिव्हाइसेससोबत सहज इंटिग्रेशनवर ठेवण्यात आला आहे.

भारतात गॅलेक्सी बुक 6 अल्ट्रा या मॉडेलची सुरुवातीची किंमत 2 लाख 42 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे, तर गॅलेक्सी बुक 6 प्रो 1 लाख 78 हजार 990 रुपयांपासून उपलब्ध आहे. स्टँडर्ड गॅलेक्सी बुक 6 ची किंमत 1 लाख 27 हजार 990 रुपयांपासून सुरू होते. अल्ट्रा आणि प्रो मॉडेल्स फक्त ग्रे कलरमध्ये उपलब्ध असून स्टँडर्ड मॉडेल ग्रे आणि सिल्व्हर या दोन रंगांमध्ये मिळणार आहे. कंपनीकडून 24 महिन्यांची नो कॉस्ट ईएमआय, 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि स्टुडंट्ससाठी 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट अशा ऑफर्सही देण्यात येत आहेत.

ही सिरीज इंटेलच्या लेटेस्ट पँथर लेक प्रोसेसरवर आधारित असून एआय टास्क आणि हाय परफॉर्मन्ससाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रीमियम लॅपटॉप सेगमेंटमध्ये या सिरीजची चांगली स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande