पुढील आठवड्यात शेअर मार्केटमध्ये फक्त तीन दिवस होणार व्यवहार
नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.)। पुढील आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर ट्रेडिंग फक्त तीन दिवसच होणार आहे. दोन अधिकृत सुट्ट्या आणि वीकएन्ड मिळून एकूण चार दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ह
Share Market to Trade for Only Three Days Next Week


नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.)। पुढील आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर ट्रेडिंग फक्त तीन दिवसच होणार आहे. दोन अधिकृत सुट्ट्या आणि वीकएन्ड मिळून एकूण चार दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा खूपच छोटा ठरणार आहे. याआधी चालू आठवड्यात देखील राम नवमी निमित्त गुरुवारी ट्रेडिंग बंद होती.

पुढील आठवड्यात 31 मार्च रोजी महावीर जयंती असल्यामुळे मंगळवारी मार्केट बंद राहील. त्यानंतर 3 एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त शुक्रवारीही ट्रेडिंग होणार नाही. त्यामुळे सोमवार, बुधवार आणि गुरुवार हेच तीन दिवस शेअर मार्केटमध्ये व्यवहार होणार आहेत. वीकएन्डची सुट्टी धरल्यास सलग चार दिवस गुंतवणूकदारांना मार्केटपासून दूर राहावे लागणार आहे.

याचबरोबर पुढील काही महिन्यांतही अनेक महत्त्वाच्या सुट्ट्यांमुळे शेअर मार्केट बंद राहणार आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ट्रेडिंग बंद असेल. 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस आणि 28 मे रोजी बकरी ईद या दिवशीही मार्केटमध्ये व्यवहार होणार नाहीत. पुढे 26 जूनला मुहर्रम, 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, 20 ऑक्टोबरला दसरा, 10 नोव्हेंबरला दिवाळी-बळीप्रतिपदा, 24 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आणि 25 डिसेंबरला ख्रिसमस या दिवशी देखील मार्केट बंद राहणार आहे.

दरम्यान, मागील व्यवहारात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,690.23 अंकांनी म्हणजेच 2.25 टक्क्यांनी घसरून 73,583.22 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निफ्टी 486.85 अंकांनी म्हणजेच 2.09 टक्क्यांनी घसरून 22,819.60 वर स्थिरावला. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण पाहायला मिळत असून, पुढील आठवड्यातील कमी ट्रेडिंग दिवसांचा बाजारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande