सोनी मराठीवर ‘रविवार चित्रमेळा’ची धमाकेदार सुरुवात
मुंबई, 28 मार्च, (हिं.स.)। सोनी मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. याच परंपरेत आता सोनी मराठी घेऊन येत आहे एक खास रविवारची मेजवानी – ‘रविवार चित्रमेळा’. येत्या २९ मार्चपासून, ११ वाजता प्रत्येक रविवारी दुपारचा
रविवार झाला खास! सोनी मराठीवर ‘रविवार चित्रमेळा’ची धमाकेदार सुरुवात.


मुंबई, 28 मार्च, (हिं.स.)। सोनी मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. याच परंपरेत आता सोनी मराठी घेऊन येत आहे एक खास रविवारची मेजवानी – ‘रविवार चित्रमेळा’.

येत्या २९ मार्चपासून, ११ वाजता प्रत्येक रविवारी दुपारचा वेळ असणार आहे खास चित्रपटप्रेमींसाठी. ‘रविवार चित्रमेळा’ या नव्या उपक्रमाअंतर्गत दर रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत त्यांच्या आवडीचे, मनाला भिडणारे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नाळ जुळवणारे उत्कृष्ट मराठी चित्रपट.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले, कौटुंबिक मूल्य जपणारे आणि महाराष्ट्राने मनापासून स्वीकारलेले चित्रपट या मालिकेत सादर केले जाणार आहेत. प्रत्येक आठवड्याला एक नवा, वेगळा आणि आवडता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात होणार आहे प्रेक्षकांच्या लाडक्या ‘हिरकणी’ या चित्रपटाने. सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट ‘रविवार चित्रमेळा’चा पहिला चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

म्हणूनच, तुमचा रविवार करा आणखी खास आणि रंगतदार – पाहायला विसरू नका ‘रविवार चित्रमेळा’, दर रविवारी दुपारी, ११ वाजता फक्त सोनी मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande