रायगड - बोर्ली-मांडला येथे घरफोडी; महिलेच्या घरातून 1 लाखांची रोकड लंपास
रायगड, 29 मार्च (हिं.स.) रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील बोर्ली-मांडला (ता. मुरुड) येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने महिलेच्या घरातून 1 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8:30 त
Burglary-in-Borli-Mandla-Cash


रायगड, 29 मार्च (हिं.स.) रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील बोर्ली-मांडला (ता. मुरुड) येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने महिलेच्या घरातून 1 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना दिनांक 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8:30 ते मार्च 2026 रोजी सायंकाळी 8:30 या कालावधीत घडली. फिर्यादी महिला या बोर्ली-मांडला येथील रहिवासी असून त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून पर्समध्ये ठेवलेली 1,00,000 रुपयांची रोकड लंपास केली.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 39/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305 व 305(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून पोलीस हवालदार पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande