लातूर - धोकादायक वळणावर स्वच्छता मोहीम; ज्ञान पंढरी ग्रुपचा समाजोपयोगी उपक्रम
लातूर, 03 मार्च (हिं.स.)। औसा येथील सामाजिक व मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्ञान पंढरी ग्रुपने याकतपूर रोड (स्वामी समर्थ बोर्ड पॉईंट) येथे असलेल्या धोकादायक वळणावरील अडथळे दूर करून रस्ता सुरक्षित करण्याचा उपक्रम राबविला. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात
स्वच्छता मोहीम


लातूर, 03 मार्च (हिं.स.)।

औसा येथील सामाजिक व मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्ञान पंढरी ग्रुपने याकतपूर रोड (स्वामी समर्थ बोर्ड पॉईंट) येथे असलेल्या धोकादायक वळणावरील अडथळे दूर करून रस्ता सुरक्षित करण्याचा उपक्रम राबविला. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात होऊन जीवितहानी झाल्याची नोंद आहे.

वळणावर रस्त्याच्या कडेला साचलेली अतिरिक्त माती, कचऱ्याचे ढिगारे, अनावश्यक झुडपे व उंच गवत यामुळे समोरून येणारी वाहने वेळेत दिसत नव्हती. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत होता. ही बाब लक्षात घेऊन ग्रुपच्या वतीने सुमारे एक तास यंत्राच्या सहाय्याने अडथळे दूर करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

“या उपक्रमामुळे एखाद्याचा जरी जीव वाचला तरी ते लाखमोलाचे कार्य ठरेल,” या भावनेतून हा प्रयत्न करण्यात आल्याचे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अध्यक्ष संजय रोडगे व इतर सदस्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम पूर्ण करून घेतले. उपक्रमावेळी रस्त्याने प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांनी वाहने थांबवून उपक्रमाचे कौतुक करत ज्ञान पंढरी ग्रुपचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande