
छत्रपती संभाजीनगर, 03 मार्च (हिं.स.)। मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड आणि विजया रहाटकर यांच्या नावांची राज्यसभेसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. पराभूत उमेदवारांना संधी न देण्याच्या धोरणामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. चौथी जागा जिंकण्यासाठी भाजपला अपक्ष व मित्रपक्षांच्या मतांची गरज भासणार असून त्यासाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्येही रणनीती आखली जात आहे.
राज्यातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून प्रत्येकी ३७ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis