
सोलापूर, 03 मार्च (हिं.स.)
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि ए.आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार महिला उमेदवारांसाठी मंगळवार, दिनांक 06 मार्च 2026 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक महिला उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सदर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय.टी.आय. डिप्लोमा, ग्रॅज्युएट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीय, नर्सिंग, बी.कॉम, अशा प्रकारची एकुण 500 पेक्षा जास्त रिक्तपदे 10 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत.
नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह शुक्रवार, दिनांक 06 मार्च 2026 रोजी ठीक सकाळी 10 ते दुपारी 01 या वेळेत ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय रविवार पेठ, राजेंद्र चौक, सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड