
सोलापूर, 03 मार्च (हिं.स.)।सोलापूर लेडिज टेलर असोसिएशनच्यावतीने जागतिक टेलर दिन उत्साहात साजरा करत शहरातील जुन्या काळापासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी व उत्कृष्ट कारागिरांचा सत्कार करण्यात आला. दत्त नगर येथील दत्त मंदिर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात टेलरिंग व्यवसायातील योगदानाचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक सतीश सिरसिल्ला, अविनाश दासरी, उद्योगपती अमर पवार, उद्योगपती लक्ष्मीकांत चाटला, ॲड. प्रियांका गोरंटी उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष नरेश कोलप्याक, उपाध्यक्ष विनायक जिंदम, सचिव पुंडलिक पगडीमल यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सोलापूरमध्येलेडिज टेलरिंग क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले सुदर्शन गोगा, मधुसुदन येलदेटी, दत्तात्रय बंडी, राजू कामुती, आदी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.मान्यवरांनी आपल्या मनोगतात टेलरिंग व्यवसाय हा केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून समाजाला सौंदर्य, आत्मविश्वास आणि वेगळी ओळख देणारा व्यवसाय असल्याचे नमूद केले. “कपड्याला आकार देताना व्यक्तिमत्त्वालाही आकार दिला जातो,” असे मत व्यक्त करत या क्षेत्रातील कौशल्य, संयम आणि सर्जनशीलतेचा गौरव करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण म्याकम, सुंदरम म्याकल, अशोक बाहेती, उदयन इरकुला, गोपी तुम्मा, राजू कामुर्ती, लक्ष्मीकांत देवतराज, अमरिष पुकाळे, नरेश गडगी आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड