परभणी - सेवानिवृत्ती निमित्त सुरेश जयपूरकर यांचा सत्कार
परभणी, 03 मार्च (हिं.स.)। परभणी येथील शारदा महाविद्यालयात मुख्य लिपिक म्हणून तब्बल 28 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावलेले सुरेश इंदुबाई नारायणराव जयपूरकर यांचा सेवापूर्ती निमित्त भव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्य
परभणी - सेवानिवृत्ती निमित्त सुरेश जयपूरकर यांचा सत्कार


परभणी, 03 मार्च (हिं.स.)।

परभणी येथील शारदा महाविद्यालयात मुख्य लिपिक म्हणून तब्बल 28 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावलेले सुरेश इंदुबाई नारायणराव जयपूरकर यांचा सेवापूर्ती निमित्त भव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबन पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजयराव जोशी तसेच परभणी शहराचे महापौर सय्यद इक्बाल उपस्थित होते. अनिलजी जैन व सुनीलजी जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. व्यासपीठावर गौरवमूर्ती सुरेश जयपूरकर व त्यांच्या अर्धांगिनी सौ. मनीषा जयपूरकर उपस्थित होत्या. प्रशासकीय कर्मचार्यांच्या वतीने देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन रमेश जाधव यांनी केले.

महाविद्यालयाच्या वतीने सुरेश जयपूरकर यांचा सपत्नीक शाल, पुष्पहार, गौरवपत्र, मानपत्र, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मनोगतात विजयराव जोशी यांनी जयपूरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. महापौर सय्यद इकबाल यांनी उपस्थित राहून पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान केला.

सेवापूर्ती भाषणात सुरेश जयपूरकर यांनी आपल्या कार्यकाळातील सहकार्यांचे ऋण व्यक्त करत स्व. हेमराजजी जैन यांच्या मार्गदर्शनाची आठवण काढली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी जयपूरकर यांच्या कार्यशैलीमुळे कार्यालयीन कामकाज सुरळीत पार पडत असल्याचे सांगत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

शारदा विद्यालय प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. जोशी, शारदा विद्यालय माध्यमिकचे मुख्याध्यापक नितीन जयस्वाल, मॉडेल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य संजय जोशी, मॉडेल कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, तसेच विविध मान्यवरांनी जयपूरकर यांचा सत्कार केला. कमलताई जामकर महिला महाविद्यालय व बी. रघुनाथ महाविद्यालय यांच्या वतीनेही सन्मान करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande