गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यास मारहाण केल्याप्रकरणी ४० जणांवर गुन्हा दाखल
40 people booked for assaulting Gau Rakshak Dal activist
गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यास मारहाण केल्याप्रकरणी ४० जणांवर गुन्हा दाखल


नाशिक, 30 मार्च (हिं.स.)

- गोमांस विक्री करणाऱ्या जमावाने गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यावर दगडफेक करून मारहाण केल्याची घटना अंबड लिंक रोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कृष्णा गणेश मुंढे (रा. मिलेनियम पार्क, म्हसरूळ) यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली, की द्वारका, कसाईवाडा येथून गोमांस विक्री करणारे संशयित नासीर हाजी (रा. वडाळा नाका), सद्दाम कुरेशी, आवेश चौधरी (दोघे रा. बागवानपुरा), सोहेब कुरेशी, अरबाज कुरेशी (दोघे रा. नानावली), सलमान कुरेशी, अंजुम

कुरेशी, आरिफ चौधरी, कल्लूभाई, सलमान हे गायीची कत्तल करून हे गोमांस अंजुम कुरेशी यांच्यामार्फत अंबड लिंक रोडवरील संजीवनगर खाडीमध्ये विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फिर्यादीने गोरक्षक दलाचे सदस्य अनिकेत राजेंद्र पाटील, कृष्णा गणेश मुंढे, सिद्धेश ज्ञानेश्वर पाटील, ऋषिकेश खर्डे, नीलेश पवार, दर्शन मोरे व स्वरूप दयानंद सावंत असे सर्व जण एक्स्लो पॉईंटजवळ जमले. ते अंबड लिंक रोडवरील संजीवनगर येथे एचआर स्टीलच्या समोर खाडीत गेले असता तेथे समीर अफरोज ऑटोबॉडी वर्क्स या दुकानात एक इसम

गोमांस विक्री करताना दिसला. तेव्हा सर्व जण त्याच्या मागे धावले असता खाडीतील झोपडपट्टीजवळ एका खोलीमध्ये तो इसम लपला. हे सर्व गोरक्षक त्या खोलीमध्ये गेले असता अचानक सायरनसारखा आवाज आला. तेथे ३० ते ४० जणांचा जमाव गोळा झाला. त्या सर्वांनी फिर्यादी व त्यांच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. फिर्यादीसोबतचे काही सदस्य पळून गेल्याने संशयितांनी फिर्यादीला पकडून लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ३० ते ४० अनोळखी पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तडवी करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande