अमरावती : भानखेडा फाटा येथे तरुणीवर सामूहिक अत्याचार, 5 अटकेत
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : अमरावती शहराजवळील भानखेडा फाटा परिसरातील जंगलात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली असून, यामुळे परिसरात संतापाची लाट उफाळली आहे. माहितीनुसार,
संग्रहित लोगो


अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : अमरावती शहराजवळील भानखेडा फाटा परिसरातील जंगलात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली असून, यामुळे परिसरात संतापाची लाट उफाळली आहे.

माहितीनुसार, 29 मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास पीडिता तिच्या मित्रासोबत मोपेडने परतत होती. भानखेडा फाटा परिसरात अज्ञात आरोपींनी त्यांना अडवून जबरदस्तीने जंगलात नेले. या दरम्यान आरोपींनी पीडितेच्या मित्राला मारहाण केली आणि त्याला बांधून ठेवले, तर त्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ देखील तयार केला असल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर पीडितेने व तिच्या मित्राने तक्रार दाखल केली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्पर कारवाई करत विविध पथकांची रात्रभर शोधमोहीम राबवली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत पाचही आरोपींना अटक करण्यात यश आले.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार, मारहाण आणि लुटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पीडितेची ओळख उघड करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असा इशारा दिला आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande