
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कला सादरीकरण विभागात (डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स) जागतिक नाट्यसंवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच 'घर दोघांचे' एकांकिकेचेही सादरीकरण करण्यात आले.
प्रादर्शिक कला विभागामध्ये नाट्य संवाद प्रशिक्षण शिबिर पार पडले. यासाठी सुप्रसिध्द सिने,नाट्य अभिनेते,लेखक मा.ओंकार गोवर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 'प्रशिक्षण हे नाटासाठी अंत्यत आवश्यक आहे ', असे मत प्रतिपादन करताना विभागाच्या दैदिप्यमान इतिहासाची आणि वर्तमानाची प्रशंसा केली. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. यावेळी विभागप्रमुख प्रा डॉ.वैशाली बोदेले यांनी प्रास्ताविक करताना विभागाचे जागतिक पातळीवरील योगदान यावर प्रकाश टाकला. यानंतर आशिष देव लिखित आणि सिध्देश्वर थोरात दिग्दर्शित घर दोघांचं या एकांकिकेचा प्रयोग संपन्न झाला. आजच्या आधुनिक काळात प्रेमाच स्वरूप बदलले असताना त्यागाची भावना आणि शारीरिक नव्हे तर मानसिक पातळीवरील प्रेम कसे पारदर्शक व व्याकूळ करणारे असते याची प्रचिती या एकांकिकेतून अनुभवास आली.
विभागाच्या संपन्न झालेल्या पन्नासाव्या सुवर्ण मोहत्सवी नाट्य महोत्सवात जाहीर केल्या प्रमाणे स्व. प्रा.डॉ.रुस्तुम अचलखांब, स्व.प्रा.डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर आणि स्व.प्रा. कुमार देशमुख यांचे कार्य कर्तृत्व आणि आठवणींना उजाळा मिळून विद्यार्थ्यांना या वरील गुरुजनांच्या नावातून सतत ऊर्जा आणि प्रेरणा मिळण्यासाठी, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ.संतोष गालफाडे यांच्या तर्फे प्रदान केला जाणारा सिन्सियर आर्टिस्ट ऑफ द इअर हा पुरस्कार विभागाचा गुणी विद्यार्थी कलावंत सुमित सोळंके याला तर प्रा. प्रदीप कांबळे आणि डॉ.विशाखा शिरवाडकर यांच्या तर्फे प्रदान केला जाणारा बेस्ट डीसिप्लीन डायरेक्टर अवॉर्ड हा पुरस्कार सौरभ मोरे आणि साधना विठोरे या विद्यार्थी कलावंतांना ओंकार गोवर्धन , प्रा.डॉ.वैशाली बोदेले, डॉ.स्मिता साबळे, डॉ.गजानन दांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis