'मोरूची मावशी ' एकांकिका महोत्सवाचा समारोप
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च, (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभाग आयोजित सुवर्ण महोत्सवी नाट्यमहोत्सवाची सांगता आणि समारोप ''मोरूची मावशी '' या नाटकाने करण्यात आला. प्र.के.अत्रे लिखित आणि विभागाचा विद्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च, (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभाग आयोजित सुवर्ण महोत्सवी नाट्यमहोत्सवाची सांगता आणि समारोप 'मोरूची मावशी ' या नाटकाने करण्यात आला.

प्र.के.अत्रे लिखित आणि विभागाचा विद्यार्थी सौरभ मोरे दिग्दर्शित ' मोरूची मावशी ' हे मराठी रंगभूमीवरील अतिशय लोकप्रिय विनोदी नाटक सादर झाले.नाटकाची गोष्ट मोरू आणि भैया या दोन कॉलेजमधील मित्रांभोवती फिरते, जे एकत्र एका बंगल्यात भाड्याने राहतात.मोरूची मावशी, जी 'कांडा संस्थानची' राणी आहे, ती त्यांना भेटायला येणार असते.मावशी येणार असल्यामुळे मोरू आणि भैया आपल्या मैत्रिणी जी आणि वनिता यांना भेटायला बोलावतात. ऐनवेळी मावशीचा दौरा रद्द होतो, पण मैत्रिणी आधीच ठरल्याप्रमाणे येतात. त्यांच्यासोबत एक वयस्कर स्त्री असणे आवश्यक असते, जी 'मावशी'ची भूमिका निभावू शकेल. मावशीच्या अनुपस्थितीत, मोरू आणि भैया आपल्या तिसऱ्या मित्राला, 'बंड्या'ला, मावशीचा स्त्रीवेष परिधान करून मावशी बनण्यास भाग पाडतात.

बंड्याने साकारलेली खोटी 'मोरूची मावशी' आणि तिच्याभोवती घडणाऱ्या गमतीजमती, संवाद आणि गोंधळातून नाटकात प्रचंड विनोदनिर्मिती होते.मावशीची भूमिका रामा पाडूळे याने दमदार पद्धतीने साकारून प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले. नाटकातील इतर पत्रातील जीवा ही घरातील नोकराची व्यक्तिरेखा आपल्या चालण्या बोलण्यातून आणि शारीरिक अंगविक्षेपातून प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. त्याचबरोबर गंगू,काका,कर्नल यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.यातून एका चांगल्या विनोदी नाटकाची अनुभूती उपस्थित सर्व रसिकांनी अनुभवली. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. वैशाली बोधले, डॉ. स्मिता साबळे डॉ. गजानन दांडगे गजानन दांडगे यांच्यासह विभागातील प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी यांनी परीक्षण घेतले. आजी माजी विद्यार्थी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवासाठी यांच्यासह विभागातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande