ऑल इंग्लंड ओपन: सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत
बर्मिंगहॅम, 05 मार्च (हिं.स.)लक्ष्य सेनची ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक नंबर वन शी युकीला पराभूत केल्यानंतर, त्याने त्याचा दुसरा सामनाही जिंकला. लक्ष्यने हाँगकाँगच्या एनजी का लाँगचा पराभव करून उपांत
लक्ष्य सेन


बर्मिंगहॅम, 05 मार्च (हिं.स.)लक्ष्य सेनची ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक नंबर वन शी युकीला पराभूत केल्यानंतर, त्याने त्याचा दुसरा सामनाही जिंकला. लक्ष्यने हाँगकाँगच्या एनजी का लाँगचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता त्याचा सामना चीनच्या ली शी किंवा आयर्लंडच्या न्हाट लाँगशी होणार आहे. जो जगातील टॉप १० बॅडमिंटनपटूंध्ये आहे. जागतिक नंबर १२ लक्ष्य सेन चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने अनेक रॅली खेळल्या आणि लाँगचा २१-१९, २१-२३, २१-१० असा पराभव केला.

या सामन्यापूर्वी लक्ष्यने कधीही लॉंगविरुद्ध सामना जिंकला नव्हता. पहिल्या गेममध्ये तो मागे पडला होता. ४-६ अशा पिछाडीवरुन सावरत त्याने १५-११ अशी आघाडी घेतली. यामुळे लॉंगवर खूप दबाव आला. लक्ष्यने आक्रमक शॉट्स खेळले. पण लॉंगने जोरदार झुंज दिली आणि स्कोअर १९-१९ असा बरोबरीत आणला. लक्ष्यने जंप स्मॅशसह गेम पॉइंट मिळवला. लॉंगने वाइड शॉट खेळला, ज्यामुळे त्याला गेम मिळाला.

लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये ११-४ अशी आघाडी घेतली. लॉंगने प्रयत्न करत राहिल्याने एका क्षणी सलग पाच गुण मिळवून स्कोअर १७-१९ केला. हाँगकाँगच्या खेळाडूने २०-२० असा स्कोअर बरोबरीत आणला, गेम पॉइंट मिळवला आणि जेव्हा लक्ष्यने नेटमध्ये शॉट मारला तेव्हा सामना निर्णायक गेममध्ये गेला.

लक्ष्यने या काळात उल्लेखनीय मानसिक ताकद दाखवली. त्याने त्याच्या वेगवान आणि आक्रमक खेळाने ६-२ अशी आघाडी घेतली. त्याच्या मजबूत बचावाविरुद्ध लॉंगला संघर्ष करावा लागला. या भारतीय बॅडमिंटनपटूने क्रॉस-कोर्ट शॉटने १०-४ अशी आघाडी घेतली आणि नंतर त्याचे वर्चस्व १८-७ पर्यंत वाढवले. लाँगने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण लक्ष्यच्या उत्कृष्ट बचाव आणि चपळतेचा प्रतिकार करू शकला नाही. लक्ष्यने अनेक मॅच पॉइंट मिळवले आणि हाँगकाँगच्या बॅडमिंटनपटूचा आणखी एक शॉट बाहेर गेल्याने त्याने उपांत्य पूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

--------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande