भारत सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
-टीम इंडियाची रोमांचक मुकाबल्यात इंग्लंडवर 7 धावांनी मात-संजू सॅमसनची 87 धावांची तुफानी खेळी- अंतिम फेरीत भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी मुंबई, 05 मार्च (हिं.स.)आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा दुसरा उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इं
संजू सॅमसन


-टीम इंडियाची रोमांचक मुकाबल्यात इंग्लंडवर 7 धावांनी मात-संजू सॅमसनची 87 धावांची तुफानी खेळी- अंतिम फेरीत भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी

मुंबई, 05 मार्च (हिं.स.)आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा दुसरा उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला. आणि या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने सात धावांनी विजय मिळवला. भारताच्या २५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, जेकब बेथेलने इंग्लिश संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण तोही अपयशी ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, बेथेलने एकूण ४८ चेंडूंचा सामना केला आणि २१८.७५ च्या स्ट्राईक रेटने १०५ धावा केल्या, त्यात आठ चौकार आणि सात सुंदर षटकार मारले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, विल जॅक्सने २० चेंडूत ३५ धावा केल्या, तर डावाची सुरुवात करणाऱ्या बटलरने १७ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी अनुक्रमे प्रत्येकी एकेेक विकेट घेतली.

टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आली. पण सलामीवीर अभिषेक शर्मा ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर, इतर फलंदाजांनी जोरदार कामगिरी केली. संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह ८९ धावा फटकावत इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढववला. याव्यतिरिक्त, इशान किशनने १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा फटकावल्या, तर शिवम दुबेने २५ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ धावा केल्या.

संजू आणि शिवम दुबे व्यतिरिक्त, हार्दिक पंड्याने २७ धावा आणि तिलक वर्मा यांनी २१ धावा केल्या. या कामगिरीमुळे भारताने २० षटकांत ७ विकेट्स गमावून २५३ धावा केल्या. यामुळे भारत टी२० विश्वचषक नॉकआउट सामन्यात सर्वाधिक २५३ धावा करणारा पहिला संघ बनला. यापूर्वी, हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर होता. विंडीजच्या संघाने २०१२ च्या टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ विकेट्स गमावून २०५ धावा केल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande