
मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एअरबीएनबी भारतातील महिला होस्ट आणि महिला प्रवाशांच्या वाढत्या समुदायाचा सन्मान करत आहे. भारतातील जवळपास ३०% होस्ट महिला असून त्या ३५% ‘गेस्ट फेव्हरेट’ लिस्टिंग व्यवस्थापित करतात. उत्कृष्ट पाहुणचार आणि स्थानिक पर्यटनाला दिशा देण्यात त्यांचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित होते.
यावर्षीच्या ‘गिव्ह टू गेन’ या संकल्पनेला अनुसरून, एअरबीएनबी महिलांनी होस्टिंग आणि प्रवासाद्वारे समुदाय बळकट करण्यातील केंद्रस्थानी असलेल्या भूमिकेची दखल घेत आहे. घर, संस्कृती आणि स्थानिक अनुभवांची देवाणघेवाण करताना महिला होस्ट स्वतःसाठीच नव्हे तर त्यांच्या समुदायांसाठीही आर्थिक संधी निर्माण करीत आहेत.
एअरबीएनबीचे भारत व आग्नेय आशियासाठीचे देशप्रमुख अमनप्रीत सिंग बाजाज म्हणाले,“होस्ट म्हणून काम करणाऱ्या महिला केवळ यशस्वी व्यवसाय उभे करत नाहीत, तर स्थानिक अर्थव्यवस्थाही मजबूत करतात. जेव्हा महिला आपली घरे, कौशल्ये आणि कथा शेअर करतात, तेव्हा त्या स्वतःसोबत इतरांनाही संधी निर्माण करून देतात. पाहुणेही स्थानिक उदरनिर्वाहाला हातभार लावतात. जेव्हा महिला प्रगती करतात तेव्हा संपूर्ण समुदाय पुढे जातो.”
होस्टिंगपलीकडे, भारतीय महिला प्रवासी एअरबीएनबीवरील प्रवासाच्या प्रवृत्तीही ठरवत आहेत. ड्युओ ट्रॅव्हल आणि त्यानंतर छोटे समूह प्रवास हे महिलांचे आवडते प्रवासप्रकार ठरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई, लंडन, बँकॉक, पॅरिस, उबूद, आम्सटरडॅम, टोकियो आणि रोम ही भारतीय महिलांनी सर्वाधिक शोधलेली ठिकाणे होती. देशांतर्गत उत्तर-दक्षिण गोवा, बेंगळुरू, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि पुणे जिल्हा सर्वाधिक पसंत झाले.पारंपरिक पर्यटनस्थळांपलीकडेही महिला प्रवासी सांस्कृतिक, नैसर्गिक आणि अनुभवप्रधान ठिकाणांकडे वळत आहेत. दक्षिण कन्नड आणि मथुरा येथे बुकिंगमध्ये सुमारे ५०% वार्षिक वाढ नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर जॉर्जियातील काझबेगी येथे एअरबीएनबीवरील बुकिंगमध्ये १००% पेक्षा अधिक वाढ झाली. ही वाढ दर्शवते की महिला प्रवासी अधिक जाणिवपूर्वक, अनुभवकेंद्रित आणि स्थानिक समुदायांना हातभार लावणारे प्रवास निवडत आहेत ज्यात वैयक्तिक आठवणींसोबतच टिकाऊ पर्यटनालाही चालना मिळते.
एअरबीएनबीने गोव्यातील एअरबीएनबी आंत्रप्रुनरशिप अकादमीसारख्या उपक्रमांद्वारे पर्यटन परिसंस्थेला बळ देण्याचे काम हाती घेतले आहे. भारतातील हा पहिलाच उपक्रम असून, इच्छुक होमस्टे उद्योजकांना पाहुणचारकौशल्य, व्यवसाय व्यवस्थापन आणि शाश्वत होस्टिंगचे प्रशिक्षण दिले जाते. या कार्यक्रमाचा विशेष भर महिलांना सक्षम बनवणे आणि ग्रामीण समुदायांना समर्थन देणे हा आहे.
एअरबीएनबी कम्युनिटी फंडमार्फत सहाय्य मिळालेल्या अनेक संस्थांचे कार्यही महिलांच्या प्रगतीशी संबंधित आहे. आपला अनुभव सांगताना उत्तराखंडातील होस्ट बबिता म्हणतात “एअरबीएनबी अकादमीचे प्रशिक्षण घेण्यापूर्वी आम्ही होमस्टे चालवत होतो, परंतु कसे चालवायचे हे माहित नव्हते. एअरबीएनबीने आम्हाला नोंदणीपासून पाहुणचारापर्यंत सर्व शिकवले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि छोट्या कल्पनेचे शाश्वत उपजीविकेत रूपांतर झाले.”
या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, एअरबीएनबी महिलांसाठी अधिक समावेशक आणि परिणामकारक संधी निर्माण करण्याच्या आपल्या बांधिलकीची पुनरुज्जीवन करत आहे. होस्टिंग आणि प्रवासाद्वारे भारतीय महिला स्थानिक अर्थव्यवस्थांना सक्षम बनवत असून, पर्यटन क्षेत्र अधिक वैविध्यपूर्ण आणि लवचिक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule