रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या पारितोषिकांचे वितरण
रत्नागिरी, 7 मार्च, (हिं. स.) : आम्ही सिद्ध लेखिका परिवार रत्नागिरी जिल्हा कोकण विभागाने मराठी भाषा गौरव दिन आणि महिला दिवसांचा संगम साधून आयोजित केलेल्या विविध पारितोषिकांचे वितरण आज करण्यात आले. आम्ही सिद्ध लेखिका परिवाराने महाविद्यालयातील मुलां
आम्ही सिद्ध लेखिका पारितोषिक वितरण


रत्नागिरी, 7 मार्च, (हिं. स.) : आम्ही सिद्ध लेखिका परिवार रत्नागिरी जिल्हा कोकण विभागाने मराठी भाषा गौरव दिन आणि महिला दिवसांचा संगम साधून आयोजित केलेल्या विविध पारितोषिकांचे वितरण आज करण्यात आले.

आम्ही सिद्ध लेखिका परिवाराने महाविद्यालयातील मुलांसाठी काही विषय देऊन निबंध तसेच काव्य स्पर्धा आयोजित केली होती. आयोजन आणि नियोजन तसेच परीक्षण संस्थेच्या सदस्या उमा जोशी तसेच डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले. स्पर्धेतील विजेते असे - काव्य लेखन स्पर्धा - सेजल मेस्त्री(प्रथम), कृपा पाडळकर व वृषाली कोवळे (द्वितीय विभागून) आणि रत्नेश कांबळे व विस्मया कुलकर्णी (तृतीय विभागून). निबंध लेखन स्पर्धा - विजेते आहेत प्रगती शिंदे (प्रथम), सेजल मेस्त्री (द्वितीय) आणि वसुंधरा जाधव (तृतीय).

विजेत्यांना दोन्ही परीक्षक, ज्येष्ठ साहित्यिक सदस्या अर्चना देवधर आणि अध्यक्ष सुनेत्रा जोशी व कार्याध्यक्षा ऋतुजा कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तरुणाई लेखनाकडे वळावी, तसेच संस्थेत कार्यरत व्हावी, हाही या स्पर्धांचा उद्देश होता.

यावेळी संस्था सभासदांचे आणि विजेत्या स्पर्धकांचे लेख वाचन, काव्य वाचन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा विजय जोशी आणि आसिले रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी कार्याध्यक्ष ऋतुजा कुळकर्णी यांच्या हस्ते झाली. अध्यक्ष सुनेत्रा जोशी यांनी प्रास्ताविक केले. महिलांनी स्वतःसाठी, छंदासाठी दिवसातला निदान एक तास तरी द्यावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. नवोदितांना लेखनासाठी थोडक्यात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुराधा आपटे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande