महिला दिनापासून बीड जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
बीड, 07 मार्च, (हिं.स.)। महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वाची असलेली एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम बीड जिल्ह्यात दि. ८ मार्च – जागतिक महिला दिनापासून सुरू होणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १४ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र मुलींना मोफत HPV लस
महिला दिनापासून बीड जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ


बीड, 07 मार्च, (हिं.स.)। महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वाची असलेली एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम बीड जिल्ह्यात दि. ८ मार्च – जागतिक महिला दिनापासून सुरू होणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १४ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र मुलींना मोफत HPV लस देण्यात येणार आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक असून त्यापासून संरक्षणासाठी HPV लस अत्यंत प्रभावी मानली जाते. या मोहिमेत गार्डसिल-४ (Gardasil-4) ही लस देण्यात येणार असून ती HPV चे ६, ११, १६ आणि १८ या प्रकारांपासून संरक्षण देते.

बीड जिल्ह्यात या मोहिमेद्वारे सुमारे २२,२५३ मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय तसेच काही शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या मोहिमेत आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी सक्रिय सहभाग घेणार असून U-WIN डिजिटल प्रणालीद्वारे नोंदणी व कोल्ड चेन व्यवस्थाही पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन :

पात्र मुलींनी HPV लस घेऊन गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवावे आणि महिलांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande