गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ७२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी
बीड, 07 मार्च (हिं.स.)। गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी एकूण ७२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी महायुती सरकारने दिलेला हा खंबीर पाठिंबा कौतुकास्पद आहे. असे गेवराईचे आमदार विजयसिंह
गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ७२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी


बीड, 07 मार्च (हिं.स.)। गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी एकूण ७२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी महायुती सरकारने दिलेला हा खंबीर पाठिंबा कौतुकास्पद आहे. असे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितले

मंजूर झालेली प्रमुख कामे:

सिंदफणा नदीवरील टाकळगाव-हिंगणी बॅरेजचे बांधकाम करणे. - १९६६.५५ लक्ष रु.

गेवराई न्यायालयीन इमारतीवर पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे. - १००२.२० लक्ष रु.

घोसापुरी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (RTO) इमारत बांधकाम करणे. - १२५९.०० लक्ष रु.

शिरसदेवी ते काजळ्याचीवाडी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे. - ०९१७.१७ लक्ष रु.

लिंबारुई ते पाटेगाव रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे. - ००९९.६५ लक्ष रु.

भाटसांगवी-ब्रह्माणपूर ते वाकनाथपूर रस्त्यावर व्हेंटेड कॉजवे बांधकाम करणे. - ०२००.०० लक्ष रु.

गेवराई विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचे डांबरी नूतनीकरण करणे. - २५००.०० लक्ष रु.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande