महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; विशेष तपास पथकाचे आवाहन
बीड, 07 मार्च, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) अत्यंत गोपनीय आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन तपास यं
महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; विशेष तपास पथकाचे आवाहन


बीड, 07 मार्च, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) अत्यंत गोपनीय आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन तपास यंत्रणेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

२२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासाचा भाग म्हणून काही संशयितांच्या पॉलिग्राफ, ब्रेन मॅपिंग आणि नार्को ॲनालिसिस यांसारख्या मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल अत्यंत गोपनीय असून ते केवळ तपास यंत्रणेच्या अधिकृत अभिलेखात सुरक्षित आहेत. हे अहवाल कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा माध्यमांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून पसरणाऱ्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande