माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लाॅक
मुंबई, ७ मार्च (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दिनांक ०८.०३.२०२६ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी उपनगरीय मार्गांवर पुढीलप्रमाणे मेगा ब्लॉक परिचालित करणार आहे. मुख्य मार्ग: माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर ११.२
माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लाॅक


मुंबई, ७ मार्च (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दिनांक ०८.०३.२०२६ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी उपनगरीय मार्गांवर पुढीलप्रमाणे मेगा ब्लॉक परिचालित करणार आहे.

मुख्य मार्ग:

माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर ११.२० ते १५.४५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४० ते दुपारी १५.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानक येथून डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी १५.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या गाड्या मुलुंड स्थानक येथून अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील. या गाड्या माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्ग:

कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी १६.१० पर्यंत अप आणि डाउन हार्बर मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी १५.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी १५.४७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.

ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी १८.०० पर्यंत प्रवास करण्याची परवानगी राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande