अभा ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा परभणीत सत्कार
परभणी, 07 मार्च (हिं.स.)। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा परभणीत विशेष सत्कार करण्यात आला. अभा ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर (नांदेड) यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. अखिल
अभा ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा परभणीत सत्कार


परभणी, 07 मार्च (हिं.स.)। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा परभणीत विशेष सत्कार करण्यात आला. अभा ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर (नांदेड) यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल विलासराव कौसडीकर, परभणी महानगरपालिकेचे सदस्य झाल्याबद्दल शंकर आजेगावकर तसेच महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शंतनू सुभेदार यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास संजय वाघ, मुकुंद कुलकर्णी, दीपक कुलकर्णी आदींची विशेष उपस्थिती होती. दरम्यान, परभणी येथे आगमन झाल्यानंतर विलासराव कौसडीकर यांचा लातूरकर परिवाराच्या वतीने खारीक-खोबऱ्याचा वैशिष्ट्यपूर्ण हार घालून विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande