
आरटीओंच्या रडार वाहनांवरील कॅमेरा, सेन्सरद्वारे महामार्गावरील हालचालींवर लक्ष
लातूर, 07 मार्च (हिं.स.)।
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणान्या वाहन चालकांना ई-चलनद्वारे दंड आकारण्याची कार्यवाही वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागामार्फत केली जाते. दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या परिवहन विभागाला जानेवारी महिन्यामध्ये मिळालेल्या दोन नवीन 'हार' वाहनांद्वारे विविध महामार्गावर, रहदारीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणान्या वाहनधारकांवर कॅमेरा, सेन्सरद्वारे लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये लातूर प्रादेशिक परिवहन विभाग आणि उदगीर उपप्रादेशिक परिवहन विभागांतर्गत केलेल्या रडारद्वारे केलेल्या तपासणी विविध माहतूक नियमांचे भंग करणारे ६६०० वाहने आढळून आले आहे. दोषी आवलेल्या वाहनांना ई-बलमद्वारे दंड ठोठावण्यात येणार आहे.
१ जानेवारी ते ३१ जानेवारी वा कालावधीत जिल्ह्यात राज्य रस्ते
सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या अनुषंघाने प्रादेशिक परिवहन विभागाकडे सर्वलन्सच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या रडार प्रणालीचे दोन अत्याधुनिक वाहने प्राप्त झाले होते. या अनुबंधाने प्रादेशिक परिवहन
विभागाच्या अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षकांच्या उपश्थितीतीत जिल्ह्यातील विविध महामार्गावर, अपघात प्रवण क्षेत्रात या वाहनांनी देखरेख ठेवली जात आहे.
आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या वाहनातून हेल्मेट नसणे, सिटबेस्ट मराणे, दुचाकीवर ट्रिपल सिट जाणे, अतिवेगाने (ओव्हर स्पिडिंग) वाहने चालविणे वावर लक्ष ठेवले जात आहे. वाहतूक नियम मोडणार्या वाहनावर ई-चलनद्वारे दंड आकारण्याची
कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये जानेवारी में फेब्रुवारी या कालावधीत लातूर प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत ३६०० वाहने तर उदगीर उपप्रादेशिक परिवहन विभागांतर्गत ३००० वाहनांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक ५४६८ प्रकरणे ही विना हेल्मेट
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis