पावसाळ्याच्या आत डोंगरगाव पोहच कालव्यावर आठ गेटचे काम पूर्ण करणार- समीर भुजबळ
Work on eight gates on Dongargaon Poh Canal to be completed before monsoon season - Bhujbal
Work on eight gates on


येवला, 07 मार्च (हिं.स.)।

मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून डोंगरगाव पर्यंत पोहचले आहे. या कालव्याला विविध गावांमध्ये आठ ठिकाणी नवीन गेट पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यात येतील. या गेटच्या माध्यमातून परिसरातील बंधारे भरण्यात येतील असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध गावामध्ये आज त्यांनी संवाद दौरा केला. यावेळी आयोजित कार्यक्रम ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याचे पाणी मिळावे यासाठी अनेक गावांची मागणी आहे. या सर्व ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डोंगरगाव कालव्यावरून सर्वेक्षण करून अधिक गेट निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जास्तीत जास्त पाणी हे येवला मतदारसंघातील गावामध्ये पोहचविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ते पुढे म्हणाले की, मतदारसंघातील ज्या मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्यांची कामे आगामी काळात प्राधान्याने मार्गी लावली जातील. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रशासकीय कार्यालय यांना जोडणारे रस्ते देखील प्राधान्याने मार्गी लावली जातील. नागरिकांनी ज्या विविध मागण्या मांडल्या आहे. त्याचा प्राधान्यक्रम ठरवून त्या सर्व मार्गी लावल्या जातील. विकासाची ही कामे अविरत सुरू राहणार असून अधिक नवनवीन प्रकल्प मतदारसंघात राबविण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून विजेचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहे. विविध ठिकाणी उपकेंद्रांची निर्मिती तसेच क्षमता वाढविण्यात येत आहे. यामाध्यमातून नागरिकांचे विजेचे प्रश्न मार्गी लागत आहे. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यायेण्यासाठी वेळेवर बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. पुढील आर्थिक वर्षात विकासाची सर्व प्रलंबित कामे मार्गी लावली जातील.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande