चाळीसगावची मोहीनी शिंपी यूपीएससी परीक्षेत यशस्वी
जळगाव , 07 मार्च (हिं.स.)चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. बहाळ येथील समाजबांधव अशोक ताराचंद शिंपी यांची कन्या कु. मोहीनी अशोक शिंपी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय प्रशा
मोहीनी शिंपी


जळगाव , 07 मार्च (हिं.स.)चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. बहाळ येथील समाजबांधव अशोक ताराचंद शिंपी यांची कन्या कु. मोहीनी अशोक शिंपी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) स्थान मिळवले आहे. मोहीनीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण गाव आणि शिंपी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर मोहीनीने UPSC सारखी देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करत IAS अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande