
आपल्या २०२३-२४ च्या वार्षिक अहवालात विमा नियामकाने श्रमजीवी महिलांचा सेवांपासून वंचित गट म्हणून उल्लेख केला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) नुसार, जीवन विमा प्रवेश किंवा सरासरी जीडीपीमध्ये व्यक्त करण्यात आलेला व जीवन विमा संरक्षणासाठी भरलेला प्रीमियम २.८ टक्के इतका कमी आहे. तसेच, देशात विकल्या जाणाऱ्या एकूण पॉलिसींपैकी ३५ टक्क्यांपेक्षा कमी पॉलिसी महिलांना विकल्या जातात. याचा अर्थ असा की ६५० दशलक्षपेक्षा जास्त महिला लोकसंख्या असलेल्या देशात २ टक्क्यांपेक्षा कमी महिला जीवन विमा खरेदी करतात.
हा गट आणखी वैविध्यपूर्ण आहे, ज्यामध्ये विवाहित आणि मुले असलेल्या कामकारी महिला, कमाई न करणाऱ्या, पण घरातील योगदानासाठी भरपाई न मिळणाऱ्या गृहिणी आणि अंदाजे ७० दशलक्ष अविवाहित महिला आहेत, ज्यांच्यावर इतर अवलंबून असू शकतात. यामुळे जीवन विमा कंपन्यांना मोठी संधी मिळाली आहे, जेथे सामाजिक सुरक्षितता व देशाच्या आर्थिक विकासासाठी सर्व महिला आर्थिक स्वावलंबी असणे महत्त्वाचे आहे.
भारतात विम्याची तफावत महिलांसाठी मोठी चिंतेची बाब आहे, जी सामान्यतः ग्रामीण भागात आणि कमी उत्पन्न असलेल्या गटांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून येते. खरेतर, विमा नियामकाने त्यांच्या अलीकडील वार्षिक अहवालात श्रमजीवी महिलांचा उल्लेख वंचित गट म्हणून केला आहे. हा त्यांच्या संशोधन आणि विकास अजेंडाचा देखील भाग आहे, जे त्यांच्या 'बिमा वाहक' उपक्रमातून दिसून येते, ज्याचा देशाच्या दुर्गम भागातही विमा पोहोच सुनिश्चित करण्यासाठी महिला एजंट्सना नियुक्त करण्याचा मनसुबा आहे.
या संदर्भात, टर्म इन्शुरन्स (मुदत विमा) पॉलिसी वेगवेगळ्या उत्पन्न पातळीवरील महिलांसाठी, मग त्या कामगार क्षेत्रात असोत किंवा नसोत, व्यावहारिक पर्याय देते. हे कमी किमतीचे उत्पादन आहे, जे कमी प्रीमियमवर उच्च कव्हरेज देते.
महिलांसाठी मॉर्टेलिटी प्रीमियम कमी
महिलांचे आयुर्मान सामान्यतः पुरुषांपेक्षा दोन ते तीन वर्षे जास्त असते. महिलांचे आयुर्मान जास्त असल्याने महिला पॉलिसीधारकांसाठी मॉर्टेलिटी प्रीमियम कमी आहे.
मॉर्टेलिटी प्रीमियम हा टर्म लाइफ इन्शुरन्स प्लॅनचा महत्त्वाचा घटक आहे. शुल्कासारखा असणारा हा प्रीमियम पॉलिसीधारकाच्या कव्हर दरम्यान मृत्यूच्या जोखमीला प्रत्यक्ष कव्हर करतो. वय, लिंग, आरोग्य आणि जीवनशैली यांसारख्या घटकांवरून शुल्क निश्चित केले जाते. वयानुसार ते लक्षणीयरित्या वाढते, परिणामी प्रीमियम जास्त होतात. तसेच ट्रेंड्समधून निदर्शनास येते की महिलांना विकल्या जाणाऱ्या पॉलिसींमध्ये उच्च स्थिरता पातळी असते, कारण त्या त्यांच्या पॉलिसींसाठी प्रीमियम भरण्यात अधिक शिस्तबद्ध असतात.
जीवन विमा कंपन्या अनेकदा महिलांना विशेष विमा दर आणि वेगळ्या सेवा देऊन या स्थितीचा फायदा घेतात.
टर्म इन्शुरन्स का आवश्यक आहे
गुंतवणूक आणि बचत करण्यास मदत करणारी अनेक उत्पादने असली तरी, कर लाभ देणारा टर्म इन्शुरन्स कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करतो. या गरजा स्थान, आर्थिक स्थिती आणि अगदी कौटुंबिक संस्कृतीनुसार बदलू शकतात. अशाप्रकारे, अधिक महिलांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी वन-प्रॉडक्ट-ऑर-सर्विस-फिट्स-ऑल दृष्टिकोन सर्वोत्तम असू शकत नाही. स्त्रीची बचतीची आणि जीवनाच्या टप्प्यांवर आधारित स्थिर परताव्यांची गरज खूप जास्त असेल. तसेच, तिचे जीवन कव्हर आणि गंभीर आजारासारख्या इतर जोखीम-संबंधित गरजा तिच्या पुरुष समकक्षांपेक्षा लक्षणीयरित्या वेगळ्या असू शकतात. यासाठी महिलांसाठी डिझाइन केलेले अद्वितीय सोल्यूशन्स आवश्यक आहेत.
समाजातील सर्व घटकांमधील महिलांचे जीवन सुरक्षित केल्याने, त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्याने देशासाठी सामाजिक सुरक्षितता अधिक मजबूत होऊ शकते आणि भारतासाठी अधिक आत्मविश्वासू महिला समूह निर्माण होऊ शकतो.
- कॅस्परस जे.एच. क्रोमहाउट (श्रीराम लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ)
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी