
मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) - स्पिनी, भारतातील सगळ्या श्रेणीच्या वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचे एक अग्रगण्य असे व्यासपिठ असून, त्यांनी केलेल्या नोंदीनुसार, गुढी पाडव्याचा निमित्ताने गाडीचा डिलीवरींचे प्रमाण एका सामान्य दिवसापेक्षा तिप्पटीने वाढल्याचे लक्षात आले. या नोंदणीनुसार आजच्या आधुनिक अशा गाडी खरेदीचे निर्णय हे आपल्या सांस्कृतिक सणांशी जोडले जात असल्याचे देखील लक्षात आले.
भारतातील बऱ्याच घरांमध्ये, गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवी सुरुवात होत असताना, इच्छुक खरेदी करणारा वर्ग हा देखील वाढताना दिसून येतो. यावर्षी या सणाच्या निमित्ताने ऑटोमोबाईलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे लक्षात आले. या सणांच्या निमित्ताने ग्राहक आपली गतीशीलता आणि मालकी दोन्ही विचारपुर्वक पाऊल टाकून निवडण्याच्या प्रयत्नात दिसले.
स्पिनी कार हब्जमध्ये ग्राहकांचे येण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले. मागणी वाढली, पण तरी देखील 86 टक्के ग्राहकांना अगदी सहज असा अनुभव आला. ज्यामुळे आमचे सातत्य आणि सेवा गुणवत्ता ही अतिशय सक्रिय अशा काळात देखील सुनियोजित असल्याची पावती मिळाली.
क्षेत्रिय ट्रेन्डसचा विचार केला, तर सणांचा कालावधीमध्ये पश्चिम आणि दक्षिण भागात अधिक मागणी असल्याचे जाणविते. पुणे आणि मुंबई येथे तर दैनंदिन डिलिवरीचे प्रमाण सहा पटीने वाढले. ज्यामुळे एका दिवसात सुमारे 100 ग्राहक हाताळावे लागले. एकूणच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि कर्नाटकचा विचार केला तर गुढी पाडव्याचा दिवशी झालेल्या एकूण डिलिवरीपैकी 70 टक्के डिलिवरीज या भागातून झाल्या.
ग्राहकांची पसंती ही विश्वास आणि व्यवहार्यतेवर अधिक असून, हुंडाई आणि मारूती सुझूकी हे अधिक चालणारे आणि आवडीचे ब्रॅन्ड ठरताना दिसून येतात. हुंडाई ग्रॅन्ड i10 ही ग्राहकांची पहिली पसंती ठरली असून, पांढऱ्या रंगाची सर्वाधिक मागणी असल्याचे देखील जाणाविले. याशिवाय 53 टक्के ग्राहकांनी आर्थिक मदतीची निवड केली. ज्यामुळे रचनात्मक आणि सहज मालकीचा पर्यांयांकडे ग्राहक वळताना दिसतो आहे.
चालू ट्रेन्डवरती बोलताना, स्पिनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडंट हनिश यादव म्हणाले, “ गुढी पाडवा हा नवी सुरुवात किंवा पुनर्निमितीकरीता सांस्कृतिकरित्या फ़ारच महत्वाचा सण मानला जातो. अशा अर्थपूर्ण सणांच्या काळात आपली गाडी घ्यावी असा विचार करणारे आमचे बरेच ग्राहक आहे. डिलिवरीचा आग्रह आणि आमचा हब्जवरती दिसणारी वाढती गर्दी ही ग्राहकांची इच्छा तर व्यक्त करतेच पण स्पिनीप्रती असलेला त्यांचा विश्वास देखील दर्शविते. आमचा मानस हा पारदर्शक, विश्वसनीय आणि उत्तम गुणवत्ता असलेला अनुभव देण्याचा असून वाढती मागणी हा त्यामधील अडथळा ठरणार नाही याची देखील आम्ही काळजी घेऊ.”
स्पिनीकडे असलेल्या माहितीनुसार, वापरलेल्या गाड्यांच्या बाजारपेठेवर एक व्यापक नजर टाकली, तर सणासुदींचा मागणी काळात पसंती ही सुसंघटित आणि विश्वसनीय अशा व्यासपिठावर अधिक असल्याचे जाणविते. वर्षाला 2 लाखापर्यंतचे व्यवहार करून, कंपनी अजूनही आपल्या क्षमता भक्कम करू पाहाते आहे. ज्यामध्ये पुरवठा, गुणवत्ता, किंमत आणि ग्राहक अनुभवावरती आम्ही अधिक भर देतो आहोत. ज्यामुळे ग्राहकांना गाडीची मालकी अधिक आत्मविश्वासाने किंवा सहजतेने घेता येऊ शकेल.
स्पिनी बद्दल थोडक्यात
2015 साली सुरू झालेले, स्पिनी हे एक वापरलेल्या गाड्यांचा खरेदी करीता उत्तम असे व्यासपिठ असून, आमचा मानस हा विश्वास, सहजता आणि पारदर्शकतेसह वापरलेल्या गाड्यांची खरेदी आणि विक्री करण्याचा आहे. स्पिनी वापरलेल्या गाड्यांचा विविध श्रेणींचा खरेदी विक्रीची एक परवडू शकेल अशी साखळी असून, येथे तंत्रज्ञान आणि अचूक अशा प्रक्रियेचा माध्यमाने ग्राहकांना एक उत्तम अनुभव मिळतो. स्पिनी या व्यासपिठावरील प्रत्येक वाहनाची साधारण 200 प्रमुख मुद्यांवर तपासणी केली जाते आणि त्यानंतर देखील 5 दिवसांपर्यंतच्या कालावधीमध्ये कोणताही प्रश्न न विचारता पैसे परत करण्याची हमी, विक्रीनंतरची एक वर्षापर्यंतची वॉरंटी, मोफ़त आरसी हस्तांतरण, अधिक सोपे आर्थिक पर्याय देखील आम्ही उपलब्ध करून देतो. ज्यामुळे गाडीची मालकी ही सहज पद्धतीने घेता येऊ शकेल. 2025 मध्ये, स्पिनीने सुमारे 9 लाखांपेक्षा अधिक गाड्यांची तपासणी आणि मुल्यांकन केले असून 2 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना हाताळले आहे. कंपनी भारतभरात 57 कार हब्जचा माध्यमाने 76 शहरांमधून कार्यरत आहे, तसेच आमचे टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील बाजारपेठांमध्ये अस्तित्व अधिक मजबूत होते आहे. क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडूलकर हे स्पिनीचे धोरणात्मक गुंतवणूकदार आणि प्रमुख ब्रॅन्ड अम्बॅसॅडर आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी