सती सावित्रीचं रूप धारण करून राणी वाचवेल का इंद्राचा जीव?
मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)। ‘हुकुमाची राणी ही’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये राणी आणि इंद्राच्या आयुष्यात एक भावनिक आणि महत्त्वपूर्ण वळण पाहायला मिळणार आहे. देवीच्या मंदिरात इंद्राच्या संदर्भात काहीतरी अनिष्ट घडू शकते अशी चाहूल लागल्याने राणीच्या मना
Ra ni


मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)।

‘हुकुमाची राणी ही’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये राणी आणि इंद्राच्या आयुष्यात एक भावनिक आणि महत्त्वपूर्ण वळण पाहायला मिळणार आहे. देवीच्या मंदिरात इंद्राच्या संदर्भात काहीतरी अनिष्ट घडू शकते अशी चाहूल लागल्याने राणीच्या मनात काळजी निर्माण होते. तिला पडलेलं स्वप्न आणि जोगतीणीचा इशारा यामुळे ती इंद्राची जास्त काळजी घेते आणि त्याच्यापासून दूर न राहण्याचा निर्णय घेते. दरम्यान, जत्रेच्या गडबडीत काही अनपेक्षित घडामोडी घडू लागतात. विक्रांतने आखलेल्या कारस्थानामुळे राणीला प्रत्येक परिस्थिती हाताळणं कठीण जातं. मात्र राणीच्या उपस्थितीमुळे इंद्रावर येणारी संकटं वेळोवेळी टळताना दिसतात. या सगळ्या घडामोडींमुळे वातावरणात हळूहळू ताण निर्माण होत जातो. ज्या प्रकारे सती सावित्रीने सत्यवानाला वाचवण्यासाठी पतिव्रतेच्या बळावर यमराजाला प्रसन्न करून पतीचे प्राण परत मिळवले. अगदी त्याच प्रमाणे राणी इंद्राचे प्राण वाचवण्यासाठी लढत आहे. या सर्व आव्हानांचा राणी कशी सामना करेल? या भावनिक प्रसंगांचा उलगडा सौभाग्य संग्राम या महाएपिसोडमध्ये येत्या १२ एप्रिल रोजी दु. १ आणि सायं. ७ वाजता पाहायला मिळणार आहे.

मालिकेत राणी हे पात्र साकारणारी अभिनेत्री वैभवी चव्हाण या महाएपिसोड बद्दल म्हणाली की, “मालिकेत एक जबरदस्त आणि अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक स्त्री तिच्या पती व कुटुंबासाठी लढत असते. राणीची हीच लढाई सध्या सुरु आहे. राणी सती सावित्रीप्रमाणे इंद्राचा जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत लढताना पाहायला मिळेल मिळेल. या महाएपिसोडचं शूटिंग साताऱ्यातील खऱ्या जत्रेत पार पडलं, आणि त्या दोन दिवसांच्या प्रचंड गर्दीत, जत्रेतील मोठ्या पाळण्यात बसून आम्ही शूटिंग केलं आहे.याचबरोबर राणी तांडव करताना दिसणार आहे. जवळपास १२-१३ तास आम्हाला तांडव शूट करण्यासाठी लागले. मालिकेत गोष्ट एका रात्रीत पुढे सरकताना दिसते, पण प्रत्यक्षात आम्ही त्यासाठी सलग चार नाईट शिफ्ट्स केल्या. साताऱ्याचं कडक ऊन, दिवस-रात्र सुरू असलेलं शूटिंग या सगळ्याचा थकवा जाणवायलाच वेळ मिळाला नाही. कारण हे सगळं आम्ही आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी मनापासून करत आहोत. जत्रेत शूटिंग करताना मालिकेचे चाहते येऊन कौतुकाची थाप देत होते. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आम्ही सगळे भारावून गेलो आहोत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande