
नांदेड, 11 एप्रिल (हिं.स.)। श्रीनगर परिसरात घडलेल्या खून प्रकरणातील आरोपीच्या आईलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
अनिकेत ऊर्फ सोनू अशोक कल्याणकर (वय ३५) यांचा खून झाला होता. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. तपासादरम्यान मिळालेल्या नव्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या आईला ही अटक केली आहे. या प्रकरणातील घडामोडींमध्ये तिची भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर झालेल्या सुनावणीत तपास करण्यासाठी आरोपींची समोरासमोर चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच हस्तांतरण वारंटवर आणून तपास पुढे नेण्याची गरज असल्याचेही पोलिसांनी सांगितले. बचाव पक्षाने मात्र यांची प्रकृती गंभीर असून त्यांना कर्करोगाचा त्रास असल्याने पोलिस कोठडी देऊ नये, असा युक्तिवाद मांडला. न्यायालयाने सर्व परिस्थितीचा विचार करत आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis