जळगाव : महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्या’च्या प्रदेशाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला
जळगाव, 11 एप्रिल (हिं.स.) शहरात भरदिवसा ‘महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्या’चे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला असून, या घटनेत सपकाळे जखमी झाले आहेत. दरम्यान, संतापलेल्या टोळक्याने त्यांच्या चारचाकी वाहनाची तो
जळगाव : महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्या’च्या प्रदेशाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला


जळगाव, 11 एप्रिल (हिं.स.) शहरात भरदिवसा ‘महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्या’चे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला असून, या घटनेत सपकाळे जखमी झाले आहेत. दरम्यान, संतापलेल्या टोळक्याने त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली या घटनेनं खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुकुंद सपकाळे हे आपल्या चारचाकी वाहनाने रिंगरोड वरून बहिणाबाई गार्डनकडे जात असताना यादरम्यान, काही तरुणांच्या टोळक्याने त्यांना अडवले. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या आणि शस्त्रांच्या सहाय्याने त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला.हल्लेखोरांनी सपकाळे यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गाडीची तोडफोड केल्यानंतर हल्लेखोरांनी सपकाळे यांना लक्ष केले, ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. गाडीच्या अवस्थेवरून हल्ला किती भीषण होता याची कल्पना येते. दरम्यान, बॅनर छपाईच्या कारणावरून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. याचा तपास पोलीस करत आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande