रविवारी सीएसएमटी-विद्याविहार अप व डाऊन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक
मुंबई, ११ एप्रिल (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी मार्गांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. तपशील पुढीलप्रमाणे मेन लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – वि
रविवारी सीएसएमटी-विद्याविहार अप व डाऊन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक


मुंबई, ११ एप्रिल (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी मार्गांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.

तपशील पुढीलप्रमाणे

मेन लाईन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर

वेळ: सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी १५.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर लाईन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / बांद्रा (डाऊन)

वेळ: सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत

चुनाभट्टी / बांद्रा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (अप)

वेळ: सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील हार्बर सेवा रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत बांद्रा / गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

गोरेगाव / बांद्रा येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन व पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande