हिंगोली ,नांदेड आणि परभणीसह मराठवाड्यात भूकंपाचे सौम्य धक्के
Bhukam
भूकंप लोगो


छत्रपती संभाजीनगर, 11 एप्रिल (हिं.स.) । मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना शनिवारी सकाळी ८:४५ ते ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यात धक्के बसताच नागरिक घराबाहेर पडले. त्यानंतर लगेचच परभणी शहर व जिल्ह्याच्या काही भागांत आणि नांदेड जिल्ह्यातही जमिनीला कंप जाणवल्याने काही काळ घबराट पसरली होती.एकाच वेळी तीन जिल्ह्यांत कंपहिंगोली जिल्ह्याला ८:४५ वाजता पहिला धक्का बसला, तर त्याच्या एका मिनिटानंतर म्हणजेच ८:४६ वाजता परभणी आणि नांदेड जिल्ह्यालाही भूकंपाची जाणीव झाली. सकाळी कामाच्या गडबडीत असतानाच अचानक खिडक्या आणि घरातील भांडी वाजू लागल्याने नागरिकांना भूकंपाची खात्री पटली. विशेषतः वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात गेल्या अनेक दिवसांपासून हे सत्र सुरू आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande