परभणीतही सौम्य धक्का: जिल्हा प्रशासनाद्वारे माहिती
परभणी, 11 एप्रिल (हिं.स.)। परभणीत आज, शनिवारी सकाळी 08:44 वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात 4.7 रिष्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती भूकंप मापन केंद्र, नांदेड येथून प्राप्त झाली आहे. सदर भूकंपाचे सौम्य धक्के परभणी जिल्ह्
परभणीतही सौम्य धक्का: जिल्हा प्रशासनाद्वारे माहिती


परभणी, 11 एप्रिल (हिं.स.)। परभणीत आज, शनिवारी सकाळी 08:44 वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात 4.7 रिष्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती भूकंप मापन केंद्र, नांदेड येथून प्राप्त झाली आहे. सदर भूकंपाचे सौम्य धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील जाणवले आहेत.

या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. सध्या उपलब्ध माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही.तसेच नागरिकांनी अफवा, खोटे फोन कॉल, अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडूनच घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

भूकंपाच्या वेळी नागरिकांनी घ्यावयाची काळजी

करावे (Do’s):

1.शांत राहावे व घाबरू नये.

2.घरामध्ये असल्यास मजबूत टेबल, पलंग किंवा भिंतीच्या कोपऱ्याजवळ आसरा घ्यावा.

3.डोक्याचे संरक्षण करावे.

4.भूकंप थांबल्यानंतर सुरक्षितपणे मोकळ्या जागेत जावे.

5.गॅस, वीज पुरवठा बंद करावा (शक्य असल्यास).

6.अधिकृत सूचनांचे पालन करावे.

करू नये :

1.धावपळ करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये.

2.लिफ्टचा वापर करू नये.

3.अफवा पसरवू नये किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये.

4.विजेच्या तारा, इमारतींच्या भेगा किंवा कमकुवत संरचनांच्या जवळ जाऊ नये.

5.अनावश्यक फोन करून नेटवर्क व्यस्त ठेवू नये.

त्याचप्रमाणे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री पवन खांडके – मोबाईल क्रमांक: 9975013726

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष – संपर्क क्रमांक: 02452-226400 टोल फ़्री क्रमांक -1077

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande